Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या सभेत गोंधळ

यावललाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील नॅशनल एज्युकेशन सोसासटी यावल ची वादग्रस्त ठरलेल्या अध्यक्ष व त्यांच्या संचालक मंडळाची सर्वसाधारण सभा अखेर अनेक वर्षानंतर गोंधळाच्या वातावरणात पार पडली.

यावल येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटीची सर्वसाधारण सभा सोसायटी व्दारे संचलीत डॉ झाकीर हुसैन ऊर्दू हायस्कुल यावलच्या नुतन आयटीआय सभागृहात संस्थेचे अध्यक्ष मोहम्मद ताहेर शेख चॉंद यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या सर्वसाधारण सभेत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. संस्थेच्या घटने अनुसार प्रतिवर्ष सर्वसाधारण सभा घेणे व तिन वर्षानंतर संचालक मंडळाची निवडणुक घेणे हे नियमावलीनुसार बंधनकारक असतांना सात वर्षानंतर घेण्यात आलेली सभा ही बेकायद्याशीर असुन संस्थेचे अध्यक्ष व त्यांचे सर्व संचालक मंडळ हे पुर्णपणे नियमाबाह्य कार्य करीत असल्याचा आरोप संस्थेच्या आजीव सदस्यांच्या वतीने करण्यात आले.

याशिवाय संस्थेच्या घटना नियमावली बदलण्यास देखील सदस्यांचा तिव्र विरोध असल्याचे दिसुन आले. संस्थेचे अध्यक्ष व त्यांचे संचालक मंडळ संपुर्ण कार्य सत्तेच्या बळाचा गैरवापर करून करण्यात आले असुन ते बेकायद्याशीर असल्याचा आरोप सदस्यांनी सभेत केला. या अनेक वर्षानंतर घेण्यात आलेल्या सर्वसाधारण वार्षीक सभेत अध्यक्ष मो. ताहेर शेख चॉंद, संस्थेचे माजी अध्यक्ष व संचालक शब्बीर खान मोहम्मद खान , ईब्राहीम शेख चॉंद ,ईकबाल खान नसिर खान , अत्ताउल्ला खान सुलेमानी ,मुस्तफा खा सुब्हान खा, गुलाम रसुल गुलाम दस्तगीर अय्युब खान हमीद खान , याकुब शेख चांद , अजीज खान हमीद खान यांच्यासह सर्व संचालक या सभेस उपस्थित होते.

अध्यक्ष व त्यांच्या संचालक मंडळाच्या आर्थिक मोहात होणार्‍या बेकायद्याशीर शिक्षकांच्या नेमणुकीमुळे विद्यालयाचा शैक्षणिक दर्जा खालवला असत्याची तीव्र खंत या वेळी अनेक जेष्ठ सदस्यांनी बोलतांना व्यक्त केली.

Exit mobile version