Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नीट, जेईई आणि सीईटी परीक्षेतील गुणवंतांचा आ.अनिल पाटलांनी घरी जाऊन केला सत्कार

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | 12 वी नंतर होणाऱ्या जेईई मेन्स, मेडिकल नीट आणि सीईटी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या अमळनेरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आ.अनिल पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पालकांसह विशेष सत्कार केला.

नीट, जेईई आणि सीईटी या तिन्ही परीक्षा अतिशय कठीण आणि 12 वी नंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या सुवर्ण काळाकडे नेणाऱ्या असतात यात विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत घेतल्यानंतरच यश पदरात पडत असल्याने अश्या गुणी विद्यार्थ्यांना कुठेतरी पाठबळ व शाबासकी मिळावी यासाठी आ.अनिल पाटील दरवर्षी आपल्या भूमीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करीत असतात. यावर्षी देखील आपल्याकडील 10 विद्यार्थी या परीक्षांमध्ये चमकल्याने आमदार प्रत्यक्ष त्यांच्या घरी पोहोचले, यात जेईई मेन्स या भारतातील सर्वात कठीण परीक्षेत यशस्वी झालेला कृष्णा पाटील तसेच मेडिकल नीट परीक्षेत यशस्वी ठरलेला आदित्य सैनानी, मिताली सासनानी, धनश्री पाटील, दिव्या रायसोनी, शिशिर पाटील, पार्थ बहुगुणे, कुमुद देसले आणि इंजिनिअरिंग सीईटी परीक्षेत अमळनेरात टॉपर असलेली अर्पिता भंडारी यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार केला.

यावेळी आमदारांनी त्यांनी पुढील मेडिकल अथवा इंजिनिअरिंग प्रवेशाबाबत आपल्या अनुभवानुसार योग्य मार्गदर्शन करून काहीही आवश्यकता भासल्यास मदतीची तयारी देखील दर्शविली. या सत्काराबद्दल सर्वच पालकांनी आमदारांचे आभार व्यक्त केले.

Exit mobile version