Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निवृत्त मुख्याध्यापिका उषाकिरण खैरनार यांनी बालगृहात साजरी केली दिवाळी

एरंडोल, प्रतिनिधी | सेवानिवृत्त मुख्याध्यापिका उषाकिरण खैरनार यांनी  खडके बु.येथिल अनाथ निराधार मुलांचे आणि मुलींच्या बालगृहात दिपावळी साजरी केली.

एरंडोल येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका उषाकिरण खैरनार यांनी  खडके बु.येथिल अनाथ निराधार मुलांचे आणि मुलींच्या बालगृहात दिपावळी साजरी केली. त्यांनी बालकांना दिपावळीनिमित्त रंगीत ड्रेस, फराळ,मिठाई तसेच मनोरंजनासाठी फाटके साहित्य देऊन पालकांना मायेची ऊब दिली. बालकांचे आनंद द्विगुणीत केला. त्यांनी बालकांसोबत दिपवाळी साजरी केली त्यामुळे मुलांना फारच आनंद झाला. यावेळी संस्था उपाध्यक्ष सचिन पाटील, सचिव भिवाजी पाटील यांनी उपस्थितांचे कौतुक करून स्वागत केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मधुकर कपाटे,प्रमोद पाटील,गणेश पंडीत,ऋषीकेश ठाकरे यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version