Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांची बदली

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांची औरंगाबाद येथे बदली झाली असून रात्री उशीरा याबाबतचे आदेश निघाले आहेत. तर नंदकुमार बेडसे यांना पदोन्नती मिळाल्याने प्रवीण महाजन यांची अपर जिल्हाधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे.

वामन कदम हे २५ फेब्रुवारी २०१९ रोजी निवासी उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्त झाले होते. आता ते औरंगाबाद येथील पुरवठा विभागात उपायुक्त अथवा समकक्ष रिक्त पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. त्यांच्या बदलीचे आदेश रात्री उशीरा प्रशासनाला प्राप्त झालेले आहेत. आता त्यांच्या जागी नेमकी कुणाची नियुक्ती करण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जळगावचे अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे यांना देखील बढती मिळालेली आहे. यामुळे त्यांच्या रिक्त झालेलया पदावर प्रवीण महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version