Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निवासी उपजिल्हाधिकारीपदी राहुल पाटील

 

 

जळगाव, प्रतिनिधी । नाशिक मनपा उपायुक्त राहुल पाटील यांची जळगावच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी इगतपुरी त्र्यंबकचे उपविभागीय अधिकारी म्हणूनही काम पहिले आहे.

राहुल पाटील यांची नियुक्ती ही वामन कदम यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या निवासी उपजिल्हाधिकारी पदावर झाली आहे. ते सोमवारी आपला पदभार स्वीकारणार आहेत. वामन कदम यांची औरंगाबाद येथे पुरवठा विभागात बदली झाली आहे.

Exit mobile version