Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निवडणूक : शिवसेनेची कृउबा समितीसाठी उमेदवारांची चाचपणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जिल्ह्यात बाजार समितीची निवडणुकीच्या धामधूम सुरू सुरू झाली आहे यामध्ये शिवसेना-भाजप राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची प्रतिष्ठापनाला लागली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने उमेदवारांची चाचणी तसेच पदाधिकाऱ्यांची जिल्हाप्रमुख निलेश पाटील, जिल्हापरिषद सदस्य प्रताप पाटील यांच्या प्रमूख उपस्थिती मध्ये आढावा घेण्यासाठी बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात आगामी निवडणुकांचे नारळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या माध्यमातून उठणार आहे. कानळदा रस्त्यावरील लक्ष्मी जिनिंग येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत स्वातंत्र्यलढायचे की भाजपासोबत युती करायची याबाबत मंथन करण्यात आले आहे यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून स्वतंत्र लढण्याबाबतचा सूर म्हटला आहे. जळगाव तालुका सह ग्रामीण भागात सर्वाधिक ग्रामपंचायत विकास सोसायटी या शिवसेनेच्या ताब्यात असून यासाठी स्वतंत्र लढ्यास कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेनेच्या पदरात नक्कीच मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.

 

 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यात मंत्री गिरीश महाजन मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. शिवसेना-भाजप युती बाबत लवकरच वरिष्ठ नेते एकत्र येऊन याबाबत निर्णय घेणार आहे. ज्येष्ठ नेते सुरेश दादा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली व मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रविवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Exit mobile version