Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निवडणूक आयोगाकडून अनुराग ठाकूर, परवेश वर्मांना स्टार प्रचारकाच्या हटविण्याचे भाजपला आदेश

download 7

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) वादग्रस्त वक्तव्य करणारे केंद्रीय अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजप खासदार परवेश सिंग साहिब वर्मा यांचे नाव भाजपने स्टार प्रचारकांच्या यादीतून तात्काळ हटवावे, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

 

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनुराग ठाकूर यांनी गोळ्या घालण्याचा इशारा दिला होता, तर परवेश सिंग साहिब वर्मा यांनी शाहीन बागमधील आंदोलक तुमच्या घरात घुसून बलात्कार करतील, अशी भाषा केली होती. ठाकूर आणि परवेश सिंग यांच्या वक्तव्यानंतर देशभरातून टीकेची झोड उठली होती. यानंतर निवडणूक आयोगाने स्टार प्रचारकांच्या यादीतून तात्काळ हटविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

Exit mobile version