Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निवडणुकीआधी ग.स. सोसायटीतल्या सत्ताधार्‍यांमध्ये दुफळी

जळगाव प्रतिनिधी । ऐन निवडणूक तोंडावर आली असताना ग.स. सोसायटीतील सत्ताधारी लोकसहकार गटातील सत्ताधारी पाच संचालकांनी विरोधी सहकार गटाला साथ देत अध्यक्षांविरूद्ध तोफ डागली आहे. निवडणुकीआधीच्या या प्रकारामुळे नवीन समीकरण अस्तित्वात येण्याचे संकेत मिळाले आहेत.

सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी म्हणजेच ग.स. सोसायटीत संचालक मंडळांचा कार्यकाळ जून २०२० मध्ये संपला आहे. त्यानंतर कोविडच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने निवडणूक घेण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या अनुषंगाने लवकरच ग.स.च्या २१ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यातच विरोधी सहकार गटासोबत सत्ताधारी लोकसहकार गटाचे पाच संचालक येऊन मिळाल्याने अध्यक्ष मनोज पाटील यांना धक्का बसला आहे.

सहकार गटाचे गटनेते उदय पाटील, अजबसिंग पाटील, कैलासनाथ चव्हाण, महेश पाटील, देवेंद्र पाटील, विद्यादेवी पाटील, विक्रमादित्य पाटील, भाईदास पाटील व रागिणी चव्हाण या ९ संचालकांनी राजीनामा दिला आहे. तर लोकसहकार गटाकडून ग.स.सोसायटीचे विद्यमान उपाध्यक्ष सुनील अमृत पाटील, लोकसहकार गटाचे अध्यक्ष विलास नेरकर, तुकाराम बोरोले, सुनील निंबा पाटील, विश्‍वासराव सूर्यवंशी या ५ जणांनी जिल्हा उपनिबंधकांकडे गुरुवारी राजीनामा दिला. अध्यक्ष पाटील मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप केला

Exit mobile version