Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निलेश राणे…हिजडा शब्द मागे घ्या नाहीतर योग्य तिथे बाजार उठवला जाईल !

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा चक्क ‘हिजडा’ असा उल्लेख माजी खासदार निलेश राणे यांनी केला होता. त्यावर तृतीयपंथिय असलेल्या सारंग पुणेकर यांनी तोंडाला आळा घाला. हिजडा शब्द मागे घ्या नाहीतर योग्य तिथे बाजार उठवला जाईल, असा इशारा निलेश राणेंना दिला आहे.

 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी ट्वीट करत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी चक्क ‘हिजडा’ असा उल्लेख केला. यावरुन तृतीयपंथिय असलेल्या सारंग पुणेकर यांनी निलेश राणे यांना हिजडा’ या शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर तो मी सांगते. पण आपली बालिशबुद्धी जगावा दाखवू नका. जेव्हा नाकात वेसण नसलेलं हलगट सैरवैरा पळतं, तशी तुमची गत झाली आहे. तोंडाला आळा घाला. हिजडा शब्द मागे घ्या नाहीतर योग्य तिथे बाजार उठवला जाईल, असा इशारा दिला आहे. तसेच निलेश राणे यांनी तृतीयपंथीयांचा अपमान केला आहे. समाज कंटकांकडून तृतीयपंथियांना कायम हिणवले जाते. मात्र, चक्क माजी खासदार निलेश राणे यांनीही तृतीयपंथियांना हिणवणे चुकीचे असल्याचे देखील सारंग पुणेकर यांनी म्हटले आहे.

Exit mobile version