Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचं कोरोनामुळे निधन

 

हरिद्वार : वृत्तसंस्था । हरिद्वार येथील कुंभ मेळ्यात मध्यप्रदेशहून आलेले निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले आहे.

 

महामंडलेश्वर कपिल देव हे कोरोनाबाधित असल्याचे आढळल्यावर त्यांना देहरादून येथील कैलाश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणीच त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं.

 

हरिद्वारमध्ये कुंभ मेळ्यात   लागू करण्यात आलेल्या नियमांचे मोठ्याप्रमाणावर उल्लंघन झाले.  मागील ७२ तासांमध्ये दीड हजारांहून अधिक पॉझिटिव्ह केसस केवळ हरिद्वार कुंभ मेळा परिसरातू समोर आल्या आहेत. शिवाय अनेकांचा मृत्यू देखील झालेला आहे. बाधितांची संख्या आता आणखी वाढण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.

Exit mobile version