Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निर्भया प्रकरण : दोषी मुकेशची दया याचिका राष्ट्रपतींकडे

nirbhaya case

 

नवी दिल्ली प्रतिनिधी । निर्भया सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी मुकेश सिंहची दया याचिका दिल्ली सरकारनंतर आता दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी फेटाळली आहे. आता त्याची दयेची याचिका गृह मंत्रालयात राष्ट्रपतींकडे पाठविण्यात येणार आहे. मुकेशच्या दया याचिकेवर आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद अंतिम निर्णय घेणार आहेत.

सगळ्या देशाला प्रतिक्षा असलेल्या निर्भया प्रकरणातल्या दोषींची फाशी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. या आरोपींना 22 तारखेला फाशी देण्यात येणार होती. मात्र मुकेश सिंह या दोषीने दयेची याचिका दाखल केल्याने ठरविलेल्या तारखेला फाशी देणे शक्य नसल्याचे दिल्ली सरकारने म्हटले आहे.

या प्रकरणात चार आरोपींना सुप्रीम कोर्टाने दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र ही फाशी लांबणीवर टाकण्यासाठी आरोपी आपले सर्व उपाय अवलंबत आहे. फाशीची शिक्षा माफ व्हावी, म्हणून आरोपींना राष्ट्रपतींकडे दयेची याचिका करण्याचा अधिकार आहे. आणि ही याचिका फेटाळल्यानंतरच शिक्षेवर अंमलबजावणी करता येते. या आधीच्या अनेक घटनांमध्ये राष्ट्रपतींनी दयेच्या याचिका फेटाळल्या होत्या.

Exit mobile version