Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निर्भया प्रकरण: दोषींना २० मार्चला होणार फाशी !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या खटल्यातील चारही दोषींना 20 मार्चला पहाटे साडे पाच वाजता फाशी देण्यात येणार आहे. या चार दोषींविरोधात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने नव्याने डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे.

पवन गुप्ता, अक्षय ठाकरू, विनय शर्मा आणि मुकेश या चारही जणांना २० मार्च रोजी सकाळी ५.३० वाजता फासावर लटकावण्यात येणार आहे. त्यापूर्वी कोर्टाच्या नियमानुसार सर्व दोषी आपापल्या वकिलांची भेट घेऊ शकतील. उल्लेखनीय म्हणजे, निर्भयाच्या दोषींवर काढण्यात आलेले हे चौथं डेथ वॉरंट आहे. आरोपी पवन कुमारची याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली होती. मात्र कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार ही तारीख टळली होती. डेथ वॉरंटसाठी पुढची तारीख मिळेपर्यंत या चारही दोषींच्या फाशीला स्थगिती देण्यात आली होती. आता आज काही वेळापूर्वीच या आरोपींच्या फाशीसाठी नवं डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे.

Exit mobile version