Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निर्भयाच्या चारही मारेकर्‍यांना तिहारमध्ये फाशी

नवी दिल्ली । दिल्लीतील निर्भया प्रकरणातील चारही नराधमांनी बचावासाठी केलेली धडपड व्यर्थ झाली असून आज पहाटे या सैतानांना फासावर लटकावण्यात आले.

संपूर्ण देशाला हादरवणार्‍या दिल्ली बलात्कारकांडातील चार आरोपींना आज पहाटे तिहार कारागृहात फासावर लटकवण्यात आले. पहाटे साडेपाच वाजता जल्लादाने खटका ओढला आणि चारही आरोपींना फासावर लटकवले आणि गेल्या सव्वासात वर्षांपासून न्यायाची वाट पाहत असलेल्या दिल्लीतीत निर्भयाला न्याय मिळाला. चार दोषी मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि विनयकुमार सिंह यांना आज पहाटे साडेपाच वाजता तिहार तुरुंगात फासावर लटकवण्यात आले. एकाच वेळी चार आरोपींना फाशी देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Exit mobile version