Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निराश मद्यप्रेमी खाली हात परतले

 

पुणे, वृत्तसेवा । राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दारू विक्रीला सशर्त परवानगी मिळाली आहे. तिन्ही झोनमध्ये दारुची दुकाने उघडली जातील असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुण्यात सकाळपासूनच मद्यप्रेमींनी वाईन शॉप बाहेर गर्दी केली. काही जण तर तीन चार तासांपासून रांगेत तात्कळत उभे होते. परंतु, पुणे शहरासह जिल्ह्यात दारुची दुकान अद्याप उघडणार नसल्याचे पोलिसांनी सांगताच अनेक मद्यप्रेमींनी घरचा रस्ता धरला.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात घोषित करण्यात आलेला लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र या काळातही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दारु विक्रीला सशर्त परवानगी मिळाली आहे. यानंतर ठिकठिकाणच्या अनेक मद्यप्रेमींनी वाईन शॉपसमोर गर्दी केली. पुण्यात सकाळी ६ वाजल्यापासूनच काही मद्यप्रेमी वाईन शॉपसमोर जमा झाले होते. अनेक दिवसांनंतर दारु मिळणार यासाठी अनेक जण तब्बल ३ ते ४ तास रांगेत उभे होते. त्यामुळे पुणे शहरातील सर्व वाईन शॉपच्या दुकानांसमोर अर्धा किमीपर्यंत रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. हे मद्यप्रेमी तोंडाला मास्क, हातात पिशव्या आणि पैसे घेऊन भर उन्हात उभे होते. माञ प्रशासनाकडून कोणताही आदेश न आल्यानं वाईन शॉप सुरु झाले नाही. त्यामुळे ३ ते ४ तास रांगेत उभे राहिल्यानंतर मद्य प्रेमींची मोठी निराशा झाली. अखेर वाईन शॉप समोरील गर्दी हटवण्यासाठी पोलीस वाईन शॉप समोर दाखल झाले. त्यानंतर संताप व्यक्त करत मद्य प्रेमींनी घराचा रस्ता धरला. दरम्यान पुणे जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने सुरु करण्यासंदर्भात आतापर्यंत प्रशासनाचा कोणताच निर्णय झालेला नाही. मद्य विक्री दुकानासंदर्भात नव्याने कोणताही आदेश काढलेला नाही, दुकाने बंदच राहतील. असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने म्हटलं आहे.

Exit mobile version