Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नियम पळून लग्न समारंभात बॅन्ड वाजविण्यास परवानगी

 

निंभोरा बु।। ता. रावेर प्रतिनिधी । लग्न समारंभात बॅन्ड वाजविण्यास कुठलीही बंदी नाही तरी सर्वांनी नियमाचे पालन करून सोशल डिस्टन्सिंग ठेवून मास्क वापरुन लग्न समारंभात बॅन्ड वाजविण्यास बॅन्ड पथकांना अनुमति राहिल असे आश्वासन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत महाराष्ट्र बॅन्ड कलाकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

महाराष्ट्र बॅन्ड कलाकार संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष शाम संदानशिव , उपाध्यक्ष मोहन पाटील, राजीव बोरसे , बबन बड़गे, नीरज सोनवणे, महेंद्र सोनवणे, किशोर लोखंडे ,आलिम मास्टर, राहुल पाटील, सुरेंद्र सुरवाड़े, अमोल गुरव यासह पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांच्याकडे लग्न समारंभात बॅन्ड वाजविण्यास परवानगी देऊन सहकार्य करावे यासह विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी समाधानकारक चर्चा करून बॅन्ड वाजविण्यास अनुकुलता दर्शवली. याप्रसंगी अनीस शेख, राकेश गुरव, आतिष केदारे, भूषण सोनवणे, नितिन बूंदे, सतिष पाटील, सुखदेव गरूड़, शरद बारी, विलास सपकाळे, किशोर पाटील, भाऊसाहेब लोंढे, नारायण भालेराव ,शेख शकील,कालू मास्टर ,मुनाफ मास्टर यासह बॅन्ड संघटनेचे पदाधिकारी व जळगाव जिल्हातील बॅन्ड पथक संयोजक उपस्थित होते.

Exit mobile version