Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी स्वतंत्र चौकशी करा- संजय खन्ना

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील वरणगाव आयुध निर्माणीत शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय खन्ना यांनी केली आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील वरणगाव येथील आयुध निर्माणीत काही दिवसांपूर्वी महाव्यवस्थापकांच्या अखत्यारीत असणार्‍या दुकानदारांची फिजीकल डिस्टन्सींगचे उल्लंघन, मास्क न वापरणे आदींचे पुरावे सामाजिक कार्यकर्ते संजय खन्ना यांनी मुख्यमंत्री, जिल्हा पोलीस अधिक्षक आदींना ई-मेलच्या माध्यमातून दिले होते. यानुसार संबंधीत प्रकरणाबाबत वरणगाव पोलीस स्थानकाकडून त्यांना याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत असल्याने आपली तक्रार निकाली काढण्यात आली असल्याचे कळविण्यात आले आहे.

यावर संजय खन्ना यांनी या प्रकरणी स्वतंत्र चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

Exit mobile version