Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निमगव्हाणला ‘तापीमाई चषक’ क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

WhatsApp Image 2020 01 27 at 3.24.27 PM

चोपडा, प्रतिनिधी | तालुक्यातील निमगव्हाण येथे ‘तापीमाई चषक २०२०’ अंतर्गत प्लास्टीक बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन दि.२६ रोजी भाजपचे नेते घनश्याम अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

‘तापीमाई चषक’ क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून निमगव्हाणचे उद्योजक आर.सी.पाटील, सरपंच मंगला पाटील, उपसरपंच ज्योती कोळी, ग्रामसेवक जनार्दन विसावे, वेलेचे माजी उपसरपंच विनोद पाटील, पत्रकार प्रविण पाटील, सागर पठार आदी मान्यवर उपस्थित होते.

पहिल्या दिवशी रंगले ५ सामने

पहीला सामना मित्रा ग्रुप, चौगाव व राजे ग्रुप, अमळगाव यांच्यात झाला. त्यात चौगाव हा संघ विजयी झाला. दुसरा सामना  सुंदरगढी, चोपडा व ३ स्टार यांच्यात झाला. त्यात सुंदरगढी, चोपडा हा संघ विजयी झाला.  तिसरा सामना गलंगी बॉईज व माऊली ग्रुप, गरताड यांच्यात झाला. त्यात माऊली ग्रुप, गरताड हा संघ विजयी झाला.  चौथा सामना पातोंडा क्रिकेट क्लब व एन.सी.आर.टी, चोपडा यांच्यात झाला. त्यात एन.सी.आर.टी, चोपडा हा संघ विजयी झाला. पाचवा सामना
सरदार पटेल ग्रुप, निमगव्हाण व ७ स्टार, चोपडा यांच्यात झाला त्यात ७ स्टार, चोपडा हा संघ विजयी झाला. पंच म्हणून सचिन बाविस्कर, किरण पाटील यांनी काम पाहीले.  स्पर्धेची नोंदणी चालू आहे, नोंदणीसाठी इच्छुक संघांनी ९८२३९१०५०७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्पर्धेसाठी ग्रामसेवक जनार्दन विसावे, ग्रामविकास अधिकारी कैलास पाटील, निमगव्हाण येथील लक्ष्मण मंगल बाविस्कर, दिलीप पाटील (बाबा), रमेश ओंकार पाटील, नरेंद्र मैराळे, दिपक बाविस्कर, संजय बि-हाडे, तांदलवाडी येथील माजी सरपंच सिताराम कोळी, तापी सूतगिरणीचे संचालक राजेंद्र पाटील, नंदलाल धनगर,प्रविण पाटील (घाडवेल), तापी फाऊंडेशन, वैष्णवी टेंट हाऊस यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आयोजक तथा तापी फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल बाविस्कर, आनंद बाविस्कर, दिपक सैंदाणै, अरूण पाटील, दिपक बाविस्कर, हर्षल पाटील, किशोर बाविस्कर, प्रशांत पाटील, कोमलसिंग जाधव, रोहन बाविस्कर, प्रविण पाटील आदी परीश्रम घेत आहेत.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शशिकांत बि-हाडे यांनी केले. स्पर्धेचा शुभारंभ निमगव्हाण येथील श्री.धुनिवाले दादाजी दरबारच्या पायथ्याशी झाला.यावेळी गावासह परिसरातील क्रिकेट प्रेमी रसिक स्पर्धेस्थळी उपस्थित होते.

Exit mobile version