Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निमखेडी शिवारातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या निमखेडी शिवारातून अवैधपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर तालुका पोलीसांनी करवाई करत वाहन जप्त केले आहे. याप्रकरणी शनिवारी २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुका पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील निमखेडी शिवार परिसरातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जळगाव तालुका पोलीसांनी शनिवारी २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता पकडले. वाळू वाहतूकीबाबत परवाना विचारला असता ट्रॅक्टर चालकाकडे कोणतेही परवाना नसल्याचे आढळून आले. दरम्यान ट्रॅक्टर चालक हा वाळूचे ट्रॅक्टर सोडून पसार झाला आहे. पोलीसांनी वाळूने भरलेले वाहन जळगाव तालुका पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. याप्रकरणी पोलीस नाईक सुशिल पाटील यांच्या फिर्यादीवरून ट्रक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिपक कोळी करीत आहे.

Exit mobile version