Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नितीशकुमारच मुख्यमंत्री

 

पाटणा: वृत्तसंस्था । नीतीश कुमार हेच एनडीचे मुख्यमंत्री बनतील असे बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाद्वारे ७४ जागा जिंकत राज्यातील दुसरा मोठा पक्ष बनलेल्या भारतीय जनता पक्षाने स्पष्टपणे म्हटले आहे.

यावर कोणताही संभ्रम नसल्याचेही पक्षाने म्हटले आहे. ही आमची वचनबद्धता होती. यामध्ये कोणताही संभ्रम नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी म्हटले आहे. निवडणुकांमध्ये असे होत असते. काही अधिक जागा जिंकतात, काही कमी. मात्र आम्ही समान भागीदार आहोत, असेही मोदी पुढे म्हणाले.

नीतीश कुमार यांचा पक्ष संयुक्त जनता दलाहून अधिक जागा जिंकल्याच्या एका दिवसानंतर भारतीय जनता पक्षाकडून हे वक्तव्य आले आहे. आघाडीमध्ये मोठ्या भावाचा दर्जा हिरावून घेतल्यानंतर देखील नीतीश कुमार एनडीएचे मुख्यमंत्री होणार की नाही?, याबाबतची चर्चा सुरू झाली होती. अनेक लोक याबाबत प्रश्न विचारू लागले होते. मात्र भारतीय जनता पक्षाने याचे उत्तर देत सर्वांची तोंडे बंद केली आहेत.

भारतीय जनता पक्षाने बिहारमध्ये कधीही आपल्या पायावर शासन केलेले नाही आणि नीतीश कुमारांविना राज्यात सत्ता देखील कायम ठेवू शकलेली नाही. मात्र या वेळी भाजप हा पक्ष जेडीयूपेक्षा फारच पुढे निघून गेलेला आहे. अशात नीतीश कुमार यांच्या चौथ्या कार्यकालात शक्ती संतुलन वेगळे होण्याची शक्यता आहे, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

२४३ सदस्यसंख्या असेलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ७५ जागा जिंकत राष्ट्रीय जनता दल हा सर्वात मोठा पक्ष म्हणून प्रथम स्थानी आला आहे. तर ७४ जागा जिंकत भारतीय जनता पक्ष दुसऱ्या स्थानी आहे. नीतीश कुमार यांच्या पक्षाने ४३ जागांसह तिसऱ्या स्थानी आहे. सत्तारूढ एनडीएला १२५ जागांसह बहुमत मिळाले आहे. विरोध पक्षांच्या महाआघाडीसा ११० जागा मिळाल्या आहेत. १२ जागांवर जय-परायजयात अतिशय कमी मतांचे अंतर आहे. हिलसा येथे जेडीयू उमेदवाराने मात्र १२ मतांनी राजद उमेदवाराचा पराभव केला आहे.

Exit mobile version