निकड नसलेली कामे , उधळपट्टी टाळा , आरोग्यसेवा मजबूत करा – राहुल गांधी

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । “केंद्र सरकारला सद्भभावनेने विनंती आहे की ‘पीआर’ व अनावश्यक प्रोजेक्टवर खर्च करण्याऐवजी लस, ऑक्सिजन व आरोग्य सेवांवर लक्ष द्यावे. येणाऱ्या दिवसांमध्ये हे संकट आणखी गंभीर होईल, याला तोंड देण्यासाठी देशाला तयार करायला हवं. सध्याची दुर्दशा असहनीय आहे.”, असा सल्ला राहुल गांधी यांनी मोदी सरकारला दिला आहे

 

 

देशात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचा उद्रेक होत आहे. दररोज लाखांच्या घरात नवीन बाधित आढळून येत आहेत, शिवाय रूग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठी वाढ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून संसर्गाला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून, कडक निर्बंधदेखील लागू करण्यात आलेले आहे. शिवाय, केंद्र सरकारकडून केल्या जात असलेल्या उपाय योजनांसंदर्भात माध्यमांद्वारे माहिती देखील दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केंद्र सरकारकडे एक विनंती केली आहे.

 

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे या अगोदर राहुल गांधींनी केंद्र सरकारवर अनेकदा निशाणा साधलेला आहे. “कोविड संकट, चाचण्या नाही, लस नाही, ऑक्सिजन नाही, आयसीयू नाही… प्राथमिकता!” असं त्यांनी ट्विट केलं होतं.

 

 

कोरोनामुळे ऑक्सिजनचा स्तर घसरू शकतो, मात्र ऑक्सिजनचा तुटवडा आणि आयसीएयू बेडची कमतरतेमुळे अनेक मृत्यू होत आहे. भारत सरकार ही जबाबदारी तुमची आहे.” असं देखील राहुल गांधी म्हणाले होते.

Protected Content