Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निःशुल्क योग शिबिराचा समारोप

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचलित मु.जे. महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी विभागाअंतर्गत एम.ए . योगिक सायन्स पदविका अभ्यासक्रमा अंतर्गत येणाऱ्या निःशुल्क योग शिबिराचा नुकताच समारोप झाला.

मंचावर सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी विभागाच्या योशिक्षिका प्रा. ज्योती वाघ, ए. टी. झांबरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक नरेंद्र पालवे उपस्थित होते. प्रा. ज्योती वाघ यांनी विध्यार्थ्यांना योगाविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन भारती मालपाणी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार एकता कवटे यांनी मानले. या शिबिराला विभागप्रमुख प्रा. देवानंद सोनार, प्रा. गीतांजली भंगाळे, प्रा. पंकज खासबागे, प्रा. अनंत महाजन, प्रा. सोनल महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.

Exit mobile version