Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निंभोरासिमच्या दोघा महिलांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील निंभोरासीम गावातील दोन महिलांचे स्वॅब सँपल हे कोरोना पॉझिटीव्ह आले असून या वृत्ताला वैद्यकीय अधिकार्‍यांनी दुजोरा दिला आहे.

 

रावेर तालुक्यातील निंभोरासिम येथील दोन महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती आज सायंकाळी आली असून यामुळे गावात खळबळ उडाली आहे. यामुळे दिवसें-दिवस तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून ग्रामस्थांच्या काळजीत भर पडली आहे. आज कोरोना बाधीत आढळून आलेल्या रूग्णांपैकी एक ४० वर्षीय महिला तर दुसरी २३ वर्षाची माहिती आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. डी. महाजन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Exit mobile version