Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ना. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांना बियाणे वाटप

जळगाव, प्रतिनिधी । आज रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेचे जिल्हाप्रमुख शिवराज पाटील यांचे संकल्पनेतुन गरिब व गरजु शेतकरी यांना मोफत बियाणे वाटप करण्यात आला आहे.

आज ना.गुलाबरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेचे जिल्हाप्रमुख शिवराज रावसाहेब पाटील यांचे संकल्पनेतुन चिंचोली, धानवड, उमाळे व कंडारी येथील गरीब व गरजु शेतकरी यांना कापूस, ज्वारी व तुर मोफत बियाणे वाटपाचा कार्यक्रम शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, जि.प सदस्य प्रताप पाटील, शिवसेना नगरसेवक शाम कोगटा यांच्या हस्ते चिंचोली येथे घेण्यात आला.

यावेळी शिवसेनेचे ता. संघटक संजय घुगे, चिंचोलीचे सरपंच शरद घुगे, पिंटू धुमाळ, चिंचोली वि. का. सो. चे व्हा. चे केतन पोळ, धानवडचे सरपंच संभाजी पवार, उपसरपंच दिलीप चव्हाण, हरीलाल शिंदे, जनार्दन पाटील, उमाळे सरपंच राजु पाटील, देविदास कोळी, कंडारी उपसरपंच मल्हारराव देशमुख आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी युवासेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख विजय लाड, तालुका सरचिटणीस अविनाश पाटील, उपतालुका प्रमुख अतुल घुगे,व जगदीश भाऊ कोळी यांनी परीश्रम घेतले.

Exit mobile version