Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ना. गुलाबराव पाटील यांचे सप्तश्रुंगी देवी व साईबाबांना साकडे

पाळधी, ता. धरणगाव प्रतिनिधी । राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी वणी येथील सप्तश्रुंगी माता आणि शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेऊन राज्यावरील कोरोनाचे संकट दूर सारण्यासाठी साकडे घातले.

ना. गुलाबराव पाटील यांनी काल दुपारी वणी येथील सप्तश्रुंगी देवीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी आज श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात दर्शन घेतले. कोरोना चे संकट टळू देण्यासाठी श्री साईबाबांना साकडे घातले आहे.

राज्य सरकार आणि त्यासोबत जळगाव जिल्हा प्रशासनाच्या मदतीने कोरोना आटोक्यात येत असला तरी दुसर्‍या लाटेचे संकट अजून कायम आहे. या पार्श्‍वभूमिवर, कोरोनाचे संकट दूर सारावे अशी प्रार्थना ना. गुलाबराव पाटील यांनी या दोन्ही देवस्थानांवर करून त्यांना साकडे घातले.

Exit mobile version