Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे माजी विद्यार्थी मेळावा

भुसावळ, प्रतिनिधी  । येथील भुसावळ कला, विज्ञान, आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता.  

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी  ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक  हे तर  उद्घाटक म्हणून आमदार संजय सावकारे तर प्रमुख उपस्थिती ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन  महेश फालक,  ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी विष्णू चौधरी, मुंबई येथून आलेले आर.पी.एफ इन्स्पेक्टर संजय गायकवाड तसेच ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे  संचालक  श्यामशेठ दरगड, निळकंठ भारंबे, प्राचार्य डॉ. मीनाक्षी वायकोळे,  उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा. शैलेश पाटील उपस्थित होते.  यावेळी कोवीड सारखा भयंकर आजार असल्याने हा मेळावा ऑनलाईन घेण्यात आला.  या मेळाव्यात ११५ विविध शहरातील माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.  या मेळाव्यात बऱ्याचशा माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाला जी मदत आवश्यक असेल ती आम्ही देऊ असे आश्वासन दिले.  यावेळी उद्घाटक आमदार संजय सावकारे यांनी यावेळी सांगीतले की, माजी विद्यार्थ्यांनी सढळ हातांनी आजी विद्यार्थ्यांना मदत करावी व आजी विद्यार्थीकरिता भविष्यात आपण नवनवीन संकल्पना राबवू व आजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले. यावेळी उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, अजय भोळे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. प्रशांत पाटील यांची मनोगते झाली. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, माजी विद्यार्थी संघटनेला आमच्या प्रशासनाकडून जे सहकार्य अपेक्षीत असेल ते आमचं प्रशासन देईल तसेच माजी विद्यार्थी संघटनेच्या पाठीशी नेहमी उभे राहील व माजी विद्यार्थ्यांना भविष्यात ज्या काही गोष्टी लागतील त्या पूर्तता करण्याची मी ग्वाही देतो.

प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ. जी. आर. वाणी यांनी केले तर ऋणनिर्देशन माजी विद्यार्थी संघटनेचे कोषाध्यक्ष तसेच मेळावा समन्वयक प्रा. हर्षल पाटील आणि सूत्रसंचालन  मेघा चौधरी,  ममता कोल्हे यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी आशिष चौधरी. प्रा. चंद्रकांत सरोदे, डॉ. गौरी पाटील, प्रा. दीपक पाटील, अजय  भोळे,  संतोष विनंते,  प्रा. स्वाती शेळके,  डॉ. सचिन येवले, डॉ. स्वाती फालक, डॉ. उमेश फेगडे, प्रा. संगीता भिरूड, डॉ. सचिन कोलते, डॉ. अजय क्षीरसागर, प्रा. महेश सरोदे,  प्रा. शंकर पाटील,  प्रा. जितेंद्र आडोकार, प्रा. दिपाली नेमाडे, प्रा. काजल वारके, प्रा. कल्याणी पाटील यांनी  परिश्रम घेतले.

 

Exit mobile version