Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नास्त्याची गाडी लावणाऱ्या महिलेला शिवीगाळ व मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शाहू नगरातील तेली समाज मंगल कार्यालयाजवळ नास्त्याची गाडी लावणाऱ्या एका महिलेला शिवीगाळ करून दारूच्या नशेत एकाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी १ जुलै रोजी दुपारी ४ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, मोनीका कैलास पवार (वय-३८) रा. तुकाराम वाडी, जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शाहू नगरातील तेली समाज मंगल कार्यालयाजवळ त्या नास्तागाडी लावून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवारी १ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांच्या गाडीजवळ फारूख मजिद भिस्ती रा. पिंप्राळा हुडको, जळगाव हा दारूच्या नशेत आला. त्यानंतर महिलेला शिवीगाळ केली. याचा जाब विचारल्याने त्याने महिलेला शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी फारूख मजिद भिस्ती याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.

Exit mobile version