Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नाशिराबाद येथून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; तरूणावर गुन्हा

 

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील अल्पवयीन मुलीला गावातील तरूणाने फुस लावून पळवून नेल्याची घटना शनिवारी उघडकीला आली. याप्रकरणी तरूणाविरूध्द नाशिराबाद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, शहरातील भवानी नगरात राहणारी १७ वर्षीय मुलगी आपल्या आईवडीलांसह राहते. गावातील भुषण रघुनाथ कोलते रा. भवानी पेठ या तरूणाने १९ फेब्रुवारी सकाळी ११ ते २० फेब्रुवारी रात्री २ वाजेच्या दरम्यान अल्पवयीन मुलीला फुसलावून पळविले. याप्रकरणी मुलीच्या आईवडीलांना शोधाशोध केली असता मिळून आली नाही. नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्याकडे तपास करूनही मिळून आली नाही. दरम्यान त्यांनी गल्लीतील भुषण कोलते याच्यावर संशय आला. तोदेखील घरी नसल्याचे दिसून आले. याप्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात संशयित आरोपी भुषण कोलते याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि राजेंद्र साळुंखे करीत आहे. 

Exit mobile version