Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नाशिक जिल्ह्यात भीषण अपघात; पाचोर्‍याचे तीन जण ठार

पाचोरा प्रतिनिधी । नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंतजवळ एका रूग्णवाहिकेला ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत पाचोर्‍यातील बाहेरपुरा येथील तीन जणांचा मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सध्या लॉकडाऊन सुरू असले तरी गंभीर स्थितीत असणार्‍या रूग्णाच्या उपचाराची मुभा आहे. या अनुषंगाने पाचोरा येथील एका रूग्णाला एमएच-०३ एएच४६७७ या क्रमांकाच्या रूग्णवाहिकेमध्ये नाशिकला उपचारासाठी नेण्यात येत होते. रात्री नऊच्या सुमारास पिंपळगाव बसवंत जवळच्या शिरवाडे फाटा येथे या रूग्णवाहिकेला ट्रॅक्टरने धडक दिली. यात अजिजाबी मोईद्दिन बागवान (वय ६०), रफिऊद्दिन मोईद्दिन बागवान (वय ५५) आणि कमरूबी मोहिनोद्दिन बागवान (वय ६०) सर्व राहणार पाचोरा हे जागीच ठार झाले आहेत. यातील दोन्ही महिला या रफिउद्दीन यांच्या बहिणी होत्या. या अपघातात रूग्ण वाहिकेचा चालक सागर पाटील या देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version