नाशिकला हवे होते घर; विवाहितेचा छळ सुरू

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | नाशिकला घर घेण्यासाठी माहेरून ५ लाख रुपये घेऊन ये म्हणत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिस स्थानकात पोलीस पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील एका २७ वर्षीय महिलेचा विवाह २०२० मध्ये सचिन बध्धू चव्हाण रा. शिवदर्शन नगर, चाळीसगाव यांच्याशी झाला. पती सचिन बध्धू चव्हाण हे मालेगाव येथे पोलीस दलात चालक म्हणून कार्यरत असून सुरूवातीला पतीकडून चांगली वागणूक मिळाली. त्यानंतर नाशिकला घर घेण्यासाठी विवाहितेला माहेरून ५ लाख रुपये घेऊन ये सांगून पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळाला सुरूवात केली.

या गोष्टीला कंटाळून विवाहितेने शेवटी पोलीस स्थानक गाठून पती सचिन चव्हाण, सासरे बध्धू चव्हाण, सासू सगूणाबाई चव्हाण रा. शिवदर्शन नगर, धुळे रोड, चाळीसगाव , जेठ अविनाश बध्धू चव्हाण रा. नाशिक, नणंद वैशाली संदीप राठोड रा. पाचोरा, माम सासरे अशोक नथ्थू राठोड व विजय नथ्थू राठोड दोन्ही रा. पिंपळगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

Protected Content