Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नाशिकमध्ये महिलेला बसस्थानकावर पेट्रोल टाकून पेटवले

fire

 

नाशिक (वृत्तसंस्था) लासलगाव बसस्थानकावर एका विधवा महिलेला भरदिवसा चार ते पाच मुलांनी पेट्रोल टाकून पेटवल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे लासलगावमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. पिडीत महिला ४० टक्के भाजली असून हा सर्व प्रकार अनैतिक संबंधातून घडल्याची प्राथमिकी माहिती समोर आली आहे.

 

पिडीत महिला पिंपळगावमध्ये राहणारी आहे. तिचे एका तरुणाशी अनैतिक संबंध होते. मात्र, या तरुणाचे लग्न ठरल्यामुळे दोघांच्या संबंधांमध्ये दुरावा आला होता. यानंतर या महिलेने तरुणाचा साखरपुडा मोडण्याचा प्रयत्न केला. याच रागातून या तरुणाने आपल्या मित्रांसह या महिलेला जाळण्याचा प्रयत्न केला. असून तिला लासलगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला उपचारासाठी नाशिकला हलवण्यात येणार आहे.

Exit mobile version