Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नाशकात युवकावर सिनेस्टाईलने पाठलाग करुन गोळीबार

पंचवटी (वृत्तसंस्था) नाशिक येथील मखमलाबाद रोडवरील शांतीनगर परिसरात राहणाऱ्या एका युवकावर सिनेस्टाईलने पाठलाग करुन चैाघांनी गोळीबार केला आहे. या गोळीबारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडालीय.

मखमलाबाद रोडवरील उदयनगरात कामानिमित्त किरण भडांगे हा युवक आलेला होता. यावेळी अचानक प्रशांत फड, कुणाल ऐखंडे, चेतन वाघ आणि सचिन या संशयितांनी किरणवर बेछूट गोळीबार करायला सुरुवात केली. आरोपींनी किरण भडांगे यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी किरणला लागली. आपल्यावर गोळीबार होताच किरणने आपला जीव वाचविण्यासाठी घटनास्थळावरून पळ काढला. पण संशयितांनी हातात कोयते घेऊन त्याचा सिनेस्टाईल पाठलाग त्याच्या घरापर्यंत केला. यावेळी किरणच्या भाऊने दरवाजा उघडून त्याला घरात घेतले.

Exit mobile version