नारदाच्या गादीचा अपमान करणाऱ्या पोलीस निरिक्षकास निलंबीत करा -रवींद्र पाटील

मुक्ताईनगर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | चाळीसगाव शहरात पोलीस निरीक्षकाने चालू कीर्तनात नारदाच्या गादीवर बुटासह जावून कीर्तनकार टाळकरी उपस्थितांना अर्वाच्य भाषेत दमदाटी केली.असे कृत्य करणाऱ्या पोलीस निरीक्षकास तातडीने निलंबीत करण्याची मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर व जळगाव जिल्हा राष्टृवादी काग्रेस पार्टी अध्यक्ष रविंद्र पाटील यांनी केली आहे.

 

वारकरी संप्रदाय सर्वाना सोबत घेवून चालणारा, समाजात जातीभेद , विषमता यांना थारा न देणारा, अनिष्ट रूढी परंपरा न मानता देवप्राप्ती करीता भजन कीर्तन करणारा सहिष्णू संप्रदाय आहे. कधीही कायदा हातात घेतल्याचे उदाहरण नसलेला शांतताप्रिय संप्रदायात मात्र संतापाची तिव्र लाट पसरली आहे. ती चाळीसगाव शहरातील उर्मट पोलीस निरक्षकाने संप्रदातील अंत्यत मानाच्या नारदाच्या गादीवर चालू कीर्तनात बुटासह येवून अर्वाच्य भाषेत उपस्थितांना दमदाटी केली. वास्तविक स्पीकर दहानंतर वाजवू नये नियमामुळे राज्यभर ७-९ या वेळेत कीर्तने होत आहे. या ठिकाणी दहा वाजून पाचच मिनीटे झाली होती. पोलीस अधिकाऱ्याने सामोपचाराने आयोजकांना समज दिली असती किंवा गुन्हा दाखल करायला मोकळे असते. परंतू, तसे न करता थेट बुटासह नारदाच्या गादीवर जावून अर्वाच्य भाषा वापरून धमकी देणे निंदनीय आहे. समस्त वारकरी संप्रदायाचा घोर अपमान आहे. यामुळेच भाविकांत संतापाची तिव्र भावना आहे. तेव्हा अशा पोलीस व वारकरी यांच्यामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पोलीस निरक्षक के.के.पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी.अधिकाऱ्याने केवळ माफी मागून चालणार नाही , कारण माफी मागताना मी कर्तव्य बजावले मी युनिफाॅर्ममध्ये होतो असे अहंपणे सांगितले. वारकऱ्यांच्या वारी, यात्रा, उत्सवात, कार्यक्रमात, मंदिरात लाखो वारकरीसाठी हजारो पोलीस बंदोबस्तास असतात. परंतू, कुठेही दुरावा होत नाही. मात्र ह्या अधिकाऱ्याने आकसापोटी बेजबाबदारीपुर्वक वागणूकीने समाजात तेढ निर्माण केली म्हणून वारकऱ्यांमध्ये संतापाची भावना लक्षात घेवून तातकाळ निलंबन करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

Protected Content