Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नायगाव सावखेडा सिम येथे विविध कामांचे आमदार लता सोनवणे यांच्याहस्ते भुमीपूजन (व्हिडिओ)

यावल प्रतिनिधी । नायगाव सावखेडा सिम येथे गायरान परिसर आणि रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरणाच्या कामांचे आज आमदार लता सोनवणे, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्याहस्ते भूमीपूजन करण्यात आले.

तालुक्यातील नायगाव सावखेडा सिम परिसरात गायरान परिसर आणि रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरणाच्या कामांसाठी शासनाकडून ६ कोटी २० लाख रूपये मंजूर करण्यात आले. यात दोन्ही कामे करण्यात येणार आहे. आज आमदार लता सोनवणे यांच्याहस्ते प्रत्यक्ष कामांचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख रविंद्र सोनवणे, जळगावचे माजी नगरसेवक नाना सोनवणे, युवा सेनेचे गोटू सोनवणे, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख योगेश पाटील, दहिगावचे सरपंच अजय अडकमोल, सावखेडासिमच्या सरपंच बेबा पाटील, उपसरपंच मुबारक तडवी, ग्रामपंचायत सदस्य मुस्तफा तडवी, सिकंदर तडवी, साधना तडवी, नबाब तडवी, फातमा तडवी, लिलाधर पाटील, धनराज पाटील, गोपाल राजपुत, वैभव बाविस्कर, बळवंत पाटील, समाधान साळवे, अकबर तडवी, अलीशान तडवी, कोरपावली शिवसेनाप्रमुख नितिन पाटील यांच्यासह कार्यक्रमास सर्व शिवसेना पदाधिकारी व समस्त शिवसैनिक चोपडा यावल विधानसभा क्षेत्र व ग्रामस्थ मंडळी हे कार्यक्रमास उपस्थित होते.

Exit mobile version