Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नायगाव आरोग्य उपकेंद्रात एचआयव्ही जनजागृती शिबिर उत्साहात

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या नायगाव उपकेंद्रात किशोरवयीन मुलांसाठी एड्स जनजागृतीविषयक शिबिराचे आयोजन आज करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.

तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आयोजीत करण्यात आलेला सदर कार्यक्रम हे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ . हेमंत बऱ्हाटे , यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला ,किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. नायगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात किशोवयीन मुलींना एचआयव्ही समस्यांसंदर्भात मार्गदर्शन डॉ. धनंजय जोशी समुदाय आरोग्य अधिकारी यांनी मार्गदरशन केले. तसेच यावेळी ८० किशोरवयीन मुलींचे सिबीसि/ एचआयव्ही / एड्स ची चाचणी घेण्यात आली‌. वसंतकुमार संदानशिव यांनी एचआयव्ही संदर्भात माहिती देवुन मार्गदर्शन केले. एएनएम भावना वारके यांनी मासिक पाळीच्या अंतर्गत होणाऱ्या समस्या विषयी काळजी घेण्याबाबतची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी करीता आशा वर्कर कल्पना पाटील, अर्चना कोळी , महेमुदा तडवी, पुष्पा कोळी , नसीमा तडवी, अंगणवाडी सेविका सुरेखा पाटील, अनिता पाटील , लता पाटील, जिजाबाई पाटील, पुष्पा पाटील, सुनंदा सुरवाडे, व मदतनीस आदींनी परिश्रम घेतले.

Exit mobile version