Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नाबार्ड लाभार्थ्याकडून कुठलेही शुल्क अथवा कमीशन आकारत नाही !

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) या संस्थेची जिल्ह्यात कुठेही शाखा नाही. नाबार्ड ही संस्था जळगाव जिल्ह्यासह राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी फक्त एका जिल्हा विकास प्रबंधकाच्या माध्यमातून कार्य करते.

 

त्याचबरोबर कुठल्याही योजनेअंतर्गत नाबार्डचा प्रत्यक्ष लाभार्थीसोबत संबंध येत नाही. यासाठी नाबार्ड कुठलेही शुल्क अथवा कमीशनही आकारत नाही. जिल्हा विकास प्रबंधकाव्यतिरिक्त जिल्ह्यात नाबार्डचा कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी पदस्थापित अथवा नियुक्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे नाबार्डचा अधिकारी असल्याचे सांगून कोणी लाभार्थ्यांशी कुठलाही आर्थिक व्यवहार करीत असल्यास ती लाभार्थ्यांची फसवणूक ठरु शकते याची नोंद घ्यावी, असे आवाहन श्रीकांत झांबरे, जिल्हा विकास अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्व्ये केले आहे.

Exit mobile version