Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नाना पटोले विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची शक्यता

मुंबई : वृत्तसंस्था । विधान सभेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले हे आज आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याचे जवळपास स्पष्ट झालेले आहे

गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा सुरू आहे विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्री पद असल्यामुळे त्यांच्याकडील पद काढून ते अन्य नेत्याला द्यावे याबाबतचा मंथन पक्षश्रेष्ठी करत होते. या अनुषंगाने अनेक नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष पद मिळावे यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. यात विशेष करून माजी खासदार राजीव सातव, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा समावेश होता. यापैकी विजय वडेट्टीवार यांनी तर निकराचे प्रयत्न केले मात्र आता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा ही विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या गळ्यात पडणार असल्याचे जवळपास स्पष्ट झालेले आहे कालच नाना पटोले यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळणार असल्याचे स्पष्ट झाले होते. या पार्श्वभूमीवर नाना पाठवले आज आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची शक्यता आहे.

Exit mobile version