Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नाथाभाऊ व गिरीशभाऊंमध्ये चमच्यांमुळे दुरावा : डॉ. गुरूमुख जगवाणींचा खळबळजनक आरोप (व्हीडीओ)

 

जळगाव (प्रतिनिधी) नाथाभाऊ आणि गिरीशभाऊ या दोघा नेत्यांमध्ये काही चमच्यांमुळे दुरावा आल्याचा आरोप करत दोघांनी ‘त्या’ आगलाव्यांना दूर सारले तर दोघांमधील मतभेद एका क्षणात दूर होऊन भाजपला गतवैभव प्राप्त होईल असा आशावाद माजी आमदार डॉ. गुरूमुख जगवाणी यांनी व्यक्त केला. एकनाथराव खडसे हे पक्षाविरूध्द तोफ डागत असतांना त्यांचे खंदे समर्थक डॉ. जगवाणी यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूज’ला दिलेल्या खळबळजनक मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत.

 

डॉ. गुरूमुख जगवाणी यांनी आपल्या मुलाखतीत खडसे व महाजनांमध्ये कुणी निर्माण केला दुरावा ?, प्रश्नावर त्यांनी दोघं नेत्यांनी आपापल्या कडील चार-चार चमचे कमी केले तर दोघांमधील दुरावा काही दिवसातच दूर होईल. तसेच नाथाभाऊ समर्थकांनी मुक्ताईनगरला बैठक घेतली ही धडधडीत फेक न्यूज होती. कारण ज्यावेळी बैठक सुरु असल्याचे वृत्त येत होते, त्यावेळी ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’ अर्थात आपणच नाथाभाऊ यांची मुलाखत घेत होतात, असे जगवाणी यांनी सांगितले. खडसेंनी माझे तिकीट कापले नव्हते. त्यावेळी वेळेची गरज होती. त्यामुळे स्वतःहून तिकीट स्व. निखील खडसे यांना देण्याचे सुचविले होते,असे सांगून जगवाणी यांनी प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपाची हवाच काढून घेतली. श्री. पाटील यांनी जगवाणी यांचे तिकीट कापल्याचा खडसेंवर आरोप केला होता. निखील खडसेंचा पराभव हा पक्षातीलच काही गद्दरांमुळे झाला होता, असेही जगवाणी यांनी सांगीतले. नाथाभाऊ पक्षांतराचा विचार करत आहेत का ?, यावर डॉ. जगवाणी यांनी सांगितले की, नाथाभाऊ पक्षाच्या बाबतीत फार हळवे आहेत. त्यामुळे ते असा काही निर्णय घेणार नाहीत. त्यांनी पक्षासाठी खूप खस्ता खाल्ल्या आहेत. खरं म्हणजे त्यांच्या कामाच्या मोबदल्यात नाथभाऊंना अधिक मोठ्या उंचीवर राहायला पाहिजे होते. परंतू याचा अर्थ असा नाही की, पक्षाने खडसे साहेबांना काहीच दिले नाही. खडसे साहेबांना पक्षानेही खूप काही दिले आहे. दरम्यान, मुलाखतीच्या सुरुवातीलाच जगवाणी यांनी यावेळी कोरोना सोबत लढणारे सर्व आरोग्य कमर्चारी, डॉक्टर नर्स, पोलीस यांचासह जळगावचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे आणि पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांचे आभार मानत कोरोनामुळे मयत झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली होती.

पहा या मुलाखतीचा व्हिडीओ

Exit mobile version