Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नातीने आजीचे नाक कापले ;प्रियांका गांधींवर परेश रावल यांची टीका

मुंबई (वृत्तसंस्था) मोफत मिळालेल्या बंगल्यात राहून नातीने आजीचे नाक कापले, असे म्हणत भाजप नेते तथा अभिनेते परेश रावल यांनी प्रियांका गांधींवर जोरदार टीका केली आहे.

 

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना केंद्र सरकारने दिल्लीतील सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटिस बजावल्यापासून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तशातच भाजप नेते तथा अभिनेते परेश रावल यांनी ‘मोफत मिळालेल्या बंगल्यात राहून नातीने आजीचे नाक कापले’, असे ट्वीट केले आहे. दरम्यान, गांधी कुटुंबाला अजूनही धोका आहे. मात्र, भाजप सरकार जाणीवपूर्वक त्यांना त्रास देत असून सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

Exit mobile version