पाचोरा, प्रतिनिधी । नाचणखेडा येथील आदर्श दुध उत्पादक संस्थेने गावठाण जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम करुन इमारत बांधली आहे. चौकशी करुन बांधकाम काढण्यात यावे व संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी ग्रा पं सदस्य धर्मेंद्र पाटील यांनी जिल्हाधिकारी व गट विकास अधिकारी यांना पत्राद्वारे केली आहे.
नाचणखेडा येथील आदर्श दुध उत्पादक सहकारी सोसायटीचे चेअरमन व सचिव यांनी संगनमताने गावठाण जमिन (गट क्रं. २६१ / २) मध्ये सक्षम प्राधिकरणाने कोणतीही परवानगी दिलेली नसतांना नविन इमारतीचे बांधकाम पुर्ण केलेले आहे. ग्रा पं सदस्य धर्मेंद्र पाटील यांनी १७ मार्च २०२० रोजी जिल्हाधिकारी व गटविकास अधिकारी यांना पत्रव्यवहार करुन चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. मात्र अद्याप कुठलेही चौकशी झालेली नसुन अशा बेकायदेशीर बांधकामांकडे प्रशासनच हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याने संस्थेच्या चुकीच्या निर्णयामुळे शासकीय जागेवर अवैधरित्या झालेल्या बांधकामाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करावी नविन बांधण्यात आलेल्या इमारतीला लागलेला खर्च संबंधितांकडून वसुल करण्यात यावा. व दुधावर पोट भरणाऱ्या सभासदांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही ग्रामपंचायत सदस्य धर्मेंद्र पाटील यांनी केली आहे.