नाचणखेडा येथे शिबिरास प्रारंभ

पहूर, ता.जामनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी l येथून जवळ असलेल्या नाचणखेडा तालुका जामनेर येथे येथील दिनांक ११ मे पासून मोफत अध्यात्मिक बालसंस्कार शिबिरास प्रारंभ झाला आहे.

स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज यांच्या व श्री सद्गुरू दादा महाराजांच्या, वैकुंठवासी ह भ प विठ्ठल महाराज गोतमारे, वैकुंठवासी ह भ प शिवदास महाराज, वैकुंठवासी ह भ प कैलास महाराज, वैकुंठवासी ह भ प रामा कृष्णा पाटील यांच्या कृपा आशीर्वादाने व समस्त गावकरी मंडळी यांच्या अनमोल सहकार्याने ११ मे २०२३ ते २५ मे २०२३ असे पंधरा दिवस आध्यात्मिक बाल संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिरात दररोज सकाळी पाच ते सहा प्रातःविधी, सकाळी सहा ते सात योगासने, सकाळी सात ते आठ स्नान, सकाळी आठ ते नऊ गीता पाठ व हनुमान चालीसा पाठ, सकाळी नऊ ते दहा नाश्ता, दहा ते बारा टाळ व मृदुंगपाट, दुपारी बारा ते एक जेवण, एक ते चार विश्रांती, चार ते पाच गायन चाली, पाच ते सहा खेळ, सहा ते सात हरिपाठ ,सात ते नऊ जेवण, नऊ ते दहा संत व शूरवीरांची चरित्रे, दहा ते पाच झोप असा नित्य क्रमाने बाल संस्कार शिबिरात आयोजन करण्यात आले आहे दिनांक २४ मे २०२३ रोजी संध्याकाळी आठ ते दहा या वेळेत ह भ प श्री अविनाश महाराज चौधरी नाचणखेडेकर यांचे कीर्तन होणार असून दिनांक २५ मे २०२३ रोजी सकाळी बारा ते दोन महाप्रसाद, दुपारी चार ते सहा भव्य दिव्य पालखी सोहळा ,रात्री आठ ते दहा या वेळेत ह भ प श्री गुरु उल्हास महाराज सूर्यवंशी( अध्यापक वारकरी शिक्षण संस्था आळंदी) यांच्या कीर्तनाने शिबिराची सांगता होणार आहे.

अध्यात्मिक बाल संस्कार शिबिराचे आयोजन भागवताचार्य ह भ प श्री मंगेश महाराज चौधरी (वृंदावन) युवा कीर्तनकार ह भ प श्री अविनाश महाराज चौधरी नाचणखेडेकर,  निवृत्ती मोरे, सोपान चौधरी, यांनी आजचा पालक उद्याचा युवक आहे, परवाचा नागरिक आहे देशाचे उद्याचे भविष्य आजच्या बालकाच्या हाती आहे. त्याकरता आजचा बालक संस्करिक असणे अत्यंत गरजेचे आहे तरी पालकांनी आपल्या मुलांना या शिबिरात सहभागी करून त्यांना देशभक्त, मातृ-पितृभक्त, हरिभक्त बनविण्यासाठी या बालसंस्कार शिबिरात पाठवावे विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.

Protected Content