Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नागरी सेवा परिक्षेसाठी सवर्ण विद्यार्थ्यांना मिळणार ओबीसींप्रमाणे लाभ !

नवी दिल्ली वृत्तसंस्था । गरीब सवर्णांना १० टक्के आरक्षण दिल्यानंतर आता मोदी सरकार युपीएससी परीक्षा देणार्‍या ओपन वर्गवारीतील उमेदवारांना ओबीसींप्रमाणे लाभ देण्याची शक्यता आहे.

केंद्रातील मोदी सरकारने अलीकडेच आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांमधील सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून याला लवकरच कायद्याचे स्वरूप प्राप्त होणार आहे. या पाठोपाठ आता युपीएससी परिक्षेसाठी तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना केंद्र सरकार गिफ्ट देण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळाले आहेत. सध्या युपीएससीच्या नागरी सेवेसाठी खुल्या गटातील विद्यार्थी हे वयाच्या ३२व्या वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतात. ते सहा वेळेस या परिक्षेला बसू शकतात. मात्र मोदी सरकारच्या निर्णयामुळे त्यांना ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणार्‍या सवलती मिळतील. यामुळे ते वयाच्या ३५ व्या वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतील. तसेच त्यांना ९ वेळा परिक्षेला बसता येणार आहे. लवकरच याबाबत घोषणा होऊ शकते.

Exit mobile version