Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नागरिकांच्या जिवाशी खेळू नका : अ‍ॅड. शुचिता हाडा (व्हिडिओ)

 

जळगाव, राहूल शिरसाळे । नाशिकमधील दुर्घटना ही धोक्याची घंटा असून जळगावातही या प्रकारची दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे जिल्ह्यातील खासगी कोविड केअर सेंटरच्या फायर ऑडिटसह सर्व सुरक्षा उपाययोजनांची तपासणी करण्यात यावी अशी मागणी स्थायी समितीच्या माजी सभापती तथा नगरसेविका अ‍ॅड. शुचिता हाडा यांनी केली.

नगरसेविका अ‍ॅड. शुचिता हाडा यांनी  यासंदर्भात आयुक्त सतीश कुलकर्णी यांना निवेदनाचा आशय असा की,   महापालिका क्षेत्रातील कोरोनाचे उपचारार्थ सुरू करण्यात आलेले सर्व खासगी दवाखान्याचे फायर ऑडिट तपासून त्यानंतरच आवश्यक ती पूर्तता केल्यानंतर त्यांना परवानगी देणे बंधनकारक आहे.  मात्र अनेक दवाखाने हे सध्या स्थितीत हॉटेल, मंगल कार्यालय यांचे रूपांतर तात्पुरत्या स्वरुपात दावखाण्यात करण्यात आलेले आहे.

त्यांना परवानगी देण्यापूर्वी फायर अॅडीट नियमांची काटेकोर तपासणी करणे बंधनकारक आहे.  मात्र तसे होताना दिसून येत नाही.  भंडाऱ्याला नुकत्याच झाल्याप्रमाणे जळवात भविष्यात अशी दुर्घटना घडल्यास त्याचा सर्वस्व आपण जबाबदार असाल याची नोंद घ्यावी.  जळगाव मनपा क्षेत्रातील सर्व कोविड हॉस्पिटलच्या प्रशासनाने फायर ऑडिट   त्वरित तपासावे  व नियमाप्रमाणेच नसल्यास परवानगी ताबडतोब रद्द करावी अन्यथा त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असे अॅड. शुचिता हाडा यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, नगरसेविका अ‍ॅड. शुचिता हाडा यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांना देखील निवेदन दिले असून त्यात त्यांनी  म्हटले आहे की, नुकतेच मुंबई-नाशिक भंडारा येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हे अधोरेखित होते की कोविड केअर सेंटरला परवानगी देण्यापूर्वी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या तपासण्या होणे गरजेचे आहे. जळगाव शहरातील सर्व खासगी हॉस्पिटलचे फायर ऑडिट तपासलेले नाही. याबाबत नुकतेच आयुक्त यांना लेखी पत्र देऊन लक्षात आणून दिलेले आहे तरी जिल्हाधिकारी यांनी सर्व खासगी कोविड हॉस्पिटल सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती संपूर्ण तपासणी काटेकोरपणे करून घ्यावेत अन्यथा त्यांची परवानगी रद्द करावी अशी कोणती घटना जळगाव शहर व जिल्ह्यात घडणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

 

 

Exit mobile version