Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नांद्रा येथे सेवानिवृत्त जवान रविंद्र पाटील यांचा सत्कार

पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातील नांद्रा  येथील  रविंद्र एकनाथ पाटील हे सन २००१  सी. आर. पी. एफ. मध्ये नागपूर येथे भरती झाले होते. ते २० वर्ष देश सेवा बजावून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा आज नांद्रा येथे सत्कार करण्यात आला.

 

 

ते लहान असतांना त्यांचे वडील एकनाथ महादु पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रविंद्र पाटील यांच्या आई निथळबाई एकनाथ पाटील यांच्यावर पूर्ण परिवाराची जबाबदारी आली.  एकनाथ पाटील यांना तीन मुले व दोन मुली असे पाच अपत्य होते. त्यांनी शेतात मोलमजुरी व कष्ट करून आपल्या पाच मुलांना चांगले शिक्षण व सुसंस्कार दिले. त्यांची परिस्थिती खूप हलाखीची असतांना नितळबाई पाटील यांनी आपल्या  मुलांना चांगले शिक्षण दिले व चांगले संस्कार घडवले.  त्यानंतर रवींद्र पाटील हे सर्वात लहान असल्याने त्यांचे शिक्षण नांद्रा येथे पूर्ण झाले व त्यांनी देशसेवा करण्याचा जिद्द व चिकाटी ने ते कमी वयातच येथे सन २००१  यावर्षी नागपूर येथे भरती झालेत. आज  रवींद्र पाटील  दि. ३ ऑक्टोबर  रोजी आपल्या भारत मातेची वीस वर्ष पाच महिने अशी प्रदीर्घ सेवा करून नांद्रा येथे आपल्या जन्मभूमी परतले आहेत. त्यांनी सीआरपीएफ ९७ बटालियनमध्ये २० वर्ष ५ महिने श्री नगर, चंदिगड, छत्तीसगड, आसाम, गडचिरोली, चेन्नई, अशा विविध ठिकाणी सेवा बजावत आज सेवानिवृत्ती घेऊन आपल्या मायदेशी परतले आहेत. त्यांनी गावात आल्यानंतर सर्वप्रथम गावाचे दैवत श्री महादेव महाराजांचे दर्शन घेतले व गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचे शिव स्मारक येथे दर्शन घेतले. त्यानंतर गावाच्या वतीने ग्राम पंचायत समिती नांद्रा यांच्याकडून शाल श्रीफळ देऊन वा प्रा. यशवंत पवार यांच्याकडून मेडल देऊन त्यांचा गौरव व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विनोद तावडे, उपसरपंच शिवाजी तावडे, माजी सरपंच सुभाष तावडे तसेच तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष पाटील, ग्रामपंचायत सदस्य किशोर खैरनार, योगेश सूर्यवंशी, बंटी सूर्यवंशी, पंकज बाविस्कर, विनोद पाटील, प्रकाश पाटील, भिका पाटील, दिलीप पाटील, योगेश्वर तावडे, अनिल पाटील, दिगंबर पाटील, राजेंद्र पाटील, शालीक मिस्तरी, शिवाजी पाटील तसेच सुट्टीवर आलेले सैनिक गणेश पाटील, प्रशांत पाटील, बबलू पाटील, राहुल पाटील व मित्रपरिवार तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक व मित्र परिवार तसेच पत्रकार किरण सोनार व नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. यशवंत पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय पाटील, सोनू पाटील, विकी पाटील व मित्रपरिवार व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.

 

Exit mobile version