Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नांद्रा येथे सततधार पाऊसामुळे पुन्हा घर कोसळले       

पाचोरा, प्रतिनिधी : तालुक्यातील नांद्रा  येथे गेल्या आठ दिवसापासून सततधार पाऊस चालूच आहे. काल रात्री राहते मातीचे घर कोसळले, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

 

जळगाव जिल्हा अतिवृष्टी घोषीत करून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने दि. २७ सप्टेंबर च्या मध्यरात्री पासून पावासाचा जोर नांद्रा सह परिसरात  सुमारे १०० एम. एम. च्या सरीने कोसळत असल्याने मातीचे घरे काय ? पण स्लॅबच्या घरानांही खाली बादल्या ठेवण्याची वेळ आली आहे. अशातच नांद्रा येथील कोबंडापुरीतील रहिवासी इंदूबाई तुकाराम बाविस्कर आपल्या दोन नातवाह सह त्या घरात राहत होत्या. घर ही तसे मातीचे होते पण अचानक घर कोसळेल असे वाटत नव्हते पण सुदैवाने इंदूबाई ह्रा दि. २७ सप्टेंबर रोजी आपल्या मुलीकडे आव्हाणीला गेल्या होत्या व दोघे नातू ही गावातच राहणाऱ्या आपल्या वडीलाकडे गेल्यामुळे पुढिल अनर्थ टळला. माञ इंदूबाई यांनी उभारलेल्या कष्टापासून संसाराचा गाडा माञ कोरमडला. या घरामध्ये गॕस, स्टील भांडी, पाण्याच्या टाकी, जिवनावश्यक अन्न धान्य, शेतीचे अवजारे, पंप, कपडे व इतर संसारोपयोगी वस्तू दबल्याने मोठे प्रमाणात नूकसान झाले असून पडलेल्या घराचा पंचनामा होऊन उचित भरपाई मिळण्याची मागणी मुलगा जिभाऊ बाविस्कर, रमेश बाविस्कर यांनी केली आहे. गेल्या आठ दिवासापासून नांद्रा परिसरात अतिवृष्टी होत असून आता सर्व पक्षीय ओला दृष्काळ जाहिर करण्याची मागणी करत आहेत. शेतीचे येणारे उत्पन्न ही आता पुर्णताह नेस्तनाबूत झाले आहे. कापूस पिवळा पडून पूर्ण सडला आहे. सोयाबीनच्या शेंगाना झाडावरच कोंब फुटू लागले आहेत. मक्का, ज्वारी व इतर पिके ही आडवे होऊन भुईसपाट झाली आहेत. शासनाच्या निकषाप्रमाणे ६० एम. एम. च्या वर पावसाची नोंद झाली तर अतिवृष्टी ग्राह्य धरली जाते तरी आता सुमारे १०० एम. एम. च्या वर दररोज पर्जन्यमान होत आसून सरसकट ओला दृष्काळ जाहिर करावा अशी मागणी नांद्रा सह परिसरातील, गटातील हवालदिल झालेले  शेतकरी वर्गातून व ग्रामस्थ यांच्यातून होत आहे.

Exit mobile version