नांद्रा येथील माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्रा येथील पी.एस.पाटील माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

 

दि. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को -ऑप सोसायटी लि. शेंदुर्णी संचालित अप्पासाहेब पी. एस. पाटील माध्यमिक विद्यालय नांद्रा येथे शेंदुर्णी संस्थेचा ७८ वा वधाऀपन दिन इयत्ता १० वी चे गुणवंत्त विद्याथी बक्षिस वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. रमेश पाटील (आसनखेडे) तर प्रमुख पाहुणे स्थानिक सल्लागार समितिचे अध्यक्ष डॉ. वाय‌. जी. पाटील, उपाध्यक्ष विश्वनाथ पाटील, तंटा मुक्तीचे अध्यक्ष सुभाष पाटील, विनोद बाविस्कर, भारत पाटील (वरसाडे), वसंतराव पाटील, पत्रकार प्रा. यशवंत पवार, माहिजी माजी ग्राम पंचायत सदस्य समाधान पाटील, गौतम साळवे (माहिजी), गोपाल पाटील (कुरंगी), डॉ. पी. एस. पाटील (आसनखेडे), मनोज पाटील, पंढरी महाजन (पहाण), ईश्वर महाजन (पहाण), विकास पाटील, किशोर खैरनार, अॅड. निक्षा बि॒राडे, मुख्याध्यापक आर. एस. चौधरी उपस्थित होते.

 

कार्यालयाच्या सुरुवातीला दत्तात्रेय देवताचे पुजन समाधान पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. आचार्य गजाननराव गरुड यांच्या पुतळ्याचे पुजन व माल्यार्पण डॉ. रमेश पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच मान्यवराच्या हस्ते भारत धनसिंग पाटील,  अॅड. निक्षा बिराडे यांच्या कडुन वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात ईश्वस्तवन व स्वागत गिताणे करण्यात आली. अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. सदर प्रसंगी मान्यवरांचे पुष्प गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रास्तविक शाळेचे मुख्याध्यापक आर. एस. चौधरी यांनी संस्था स्थापना, आताची वाटचाल संदर्भात शाळेची प्रगती, आलेख याबाबत सविस्तर माहिती दिली. सदर प्रसंगी इयत्ता १० वीचे गुणवंत विद्यार्थी, विषयात प्रथम विद्यार्थी यांना शेंदुर्णी संस्थे कडून डॉ. रुपेश पाटील (पाचोरा) यांना ग्रामस्थ व शिक्षक यांच्या माध्यमातून वृक्षरोप देऊन सन्मानित केले. माजी मुख्याध्यापक एस. पी. तावडे यांच्या कडून वसतिगृह व शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले. समाधान पाटील यांनी खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी पाच हजार रुपये बक्षीस जाहीर केले.

 

शेंदुर्णी येथे संस्था अंतर्गत विज्ञान प्रदर्शन मोठ्या गटात प्रथम क्रमांक मिळवल्या बदल डॉ. रमेश पाटील यांनी ५०० रुपये बक्षिस दिले. यावेळी यशवंत पवार, वसंतराव पाटील, भारत पाटील यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आर. एन. पाटील व पी. ए. पाटील यांनी केले. उपस्थितांचे आभार एम. आर. राठोड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधु भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी, वसतिगृह अधिक्षक यांनी परिश्रम घेतले.

Protected Content