Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नांद्रा येथील भवानी मंदिरात चोरी

 

पाचोरा, प्रतिनिधी ! नांद्रा येथील भवानी मातेच्या मंदिरात अज्ञात चोरट्यांनी रात्री २० हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रामदास चौधरी  करीत आहे.

 

नांद्रानजिक लक्ष्मी अॅग्रो कंपनीने नव्यानेच बांधलेल्या भवानी मातेच्या मंदिरात २६ फेब्रुवारीरोजी पहाटे अज्ञात चोरट्यांनी दरवाजाची कडी तोडुन आत प्रवेश केला. सर्व प्रथम सी. सी. टी. व्ही. चे ५ हजार रुपये किंमतीचे डी. व्ही. आर., भवानी मातेच्या गळ्यातील २ ग्रॅम वजनाची ८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, दोन हजार रुपये किंमतीची दान पेटी व ५ हजार रुपये किंमतीची टी. व्ही. स्क्रीन (जुनी) असा सुमारे २० हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास करुन पसार झाले.

 

सकाळी मंदिराचे पुजारी यांना प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ लक्ष्मीकांत सुर्यवंशी यांना सांगितली. त्यांनी पाचोरा पोलिसात संपर्क केला असता पोलिसांनी पंचनामा करून लक्ष्मीकांत सुर्यवंशी यांचे फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला

Exit mobile version