Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नांद्रा माध्यमिक विद्यालयात शेंदुर्णी संस्था वर्धापन दिन साजरा

पाचोरा, प्रतिनिधी ।  पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील पी. एस. पाटील माध्यमिक विद्यालयात दि. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को – अॉप सोसायटी लिमिटेड, शेंदुर्णी संस्थेचा ७७ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

दि. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को – अॉप सोसायटी लिमिटेड, शेंदुर्णी संस्थेच्या  वर्धापनदिनानिमित्ताने शनिवार १७ जुलै रोजी क्रार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. वाय. जी. पाटील होते.  तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष विश्वनाथ पाटील, पोलिस पाटील किरण तावडे, ग्रामपंचायत सदस्य किशोर खैरनार, आत्माराम पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष पाटील, स्वीकृत सदस्य नंदकुमार बागुल, सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील, भारत पाटील (वरसाडे), विलास पाटील (पहाण), विश्र्वनाथ सुर्यवंशी, मुख्याध्यापक आर. एस. चौधरी उपस्थित होते. प्रास्तविक मुख्याध्यापक आर. एस. चौधरी यांनी केले.  विद्यार्थी मनोगतात घनश्याम बाविस्कर, अक्षय पाटील यांनी मत व्यक्त केले. शिक्षकांच्या वतीने एल. एम. पाटील. जे. डी. पाटील, विनोद पाटील, भारत पाटील यांनी समयोचीत मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी एन. एम. एम. एस. परीक्षा उत्तीर्ण झाल्याबदल साधना दिपक पवार हिचा डॉ. वाय. जी. पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. अध्यक्षीय भाषणात  संस्थेबद्दल शाळेतील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे, एस. एस. सी. परिक्षेच्या निकालाची परंपरा कायम ठेवण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. त्रसंचलन जी. ए. ठाकूर यांनी तर आभार पी. ए. पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांना कामकाज पहिले.

Exit mobile version