नांदेडमध्ये 4.4 रिस्टर स्केलचे भूकंपाचे धक्के

 

 

नांदेड : वृत्तसंस्था । नांदेडमध्ये आज वेगवेगळ्या शहरात अनेक भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

 

नांदेड शहरात सकाळी 8:33 मिनिटांनी वेगवेगळ्या भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्याशिवाय अनेक भागात जमिनीतून गूढ आवाज देखील झाल्याचे बोललं जात आहे. मात्र नांदेडमध्ये भूकंपाचे हे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

 

 

या भूकंपाचे केंद्रबिंदू हे यवतमाळ जिल्ह्यातील साधूनगर असल्याची माहिती भूकंपशास्त्र राष्ट्रीय केंद्राने दिली आहे. त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर ही बाब नमूद करण्यात आली आहे. यवतमाळमधील या भूकंपाची तीव्रता 4.4 रिस्टर स्केल इतकी होती. या भूकंपामुळे नांदेड जिल्ह्यात सौम्य धक्के जाणवले असल्याची शक्यता आहे.

 

Protected Content