Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नांदुरा येथे शासनाच्या ‘त्या’ परिपत्रकाची होळी !

नांदुरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे संपकरी राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांनी शासनाच्या परिपत्रकाची होळी करून आपला रोष व्यक्त केला.

 

संपूर्ण महाराष्ट्रात राज्य सरकारी जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर असे एकूण १८ लाख कर्मचारी संपावर आहेत. आज संपाचा दुसरा दिवस नांदुरा पंचायत समिती अंतर्गत एकूण १२५० कर्मचारी बांधव शिक्षक ग्रामसेवक आरोग्य सेवक नर्सेस वैद्यकीय कर्मचारी ऑफिस स्टॉप लिपिक वर्गीय कर्मचारी महसूल कर्मचारी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे नांदुरा तालुक्यातील प्रशासन ठप्प झालेले आहे.

 

शासनाने दिनांक १४ मार्च २०१३ रोजी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्त वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती गठीत केलेली आहे. सदर समिती संपकरी कर्मचार्‍यांना मान्य नाही याचा शासनाचा रोष म्हणून आज नांदुरा पंचायत समिती येथे राज्य कार्याध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ प्रशांत जामोदे यांचे नेतृत्वात सदस्य शासन निर्णयाची  होळी करण्यात आली व शासनाच्या निर्णयाचा विरोध करण्यात आला.

 

शासनाच्या नावाने बोंबाबोंब करण्यात आली व सदर शासन अभ्यास समिती संपकरी कर्मचार्‍यांना मान्य नसल्याचे यावरून सिद्ध होते. शासनाने सकारत्मक विचार करून ताबडतोब जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे धोरण स्वीकारल्याचे जाहीर करावे जेणेकरून संपावर तोडगा काढणे सोपे होईल असे याप्रसंगी आवर्जून नमूद करण्यात आले. यावेळी शिक्षण संघटना ग्रामसेवक संघटना पशुवैद्यकीय संघटना नर्सेस संघटना, महसूल संघटना,  आयटीआय निर्देशक संघटना व इतर सरकारच्या सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. अशी माहिती एका प्रसिद्ध पत्रका द्वारे प्रदीप शिंदे तालुकाध्यक्ष नांदूरा ग्रामसेवक संघटना नांदुरा यांनी कळवले आहे.

Exit mobile version