Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नशीराबाद येथे गोमांस विक्रीच्या माहिती दिल्याने वाद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील नशिराबाद गावातील मन्यार मोहल्ला येथे गोमांस विक्री वरून झालेल्या वादातून तरूणाला मारहाण करून पोलीसांशी धक्काबुक्की केल्याची घटना घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावातील मन्यार मोहल्ला येथे गोमांस विक्री होत असल्याची माहिती सागर पुरूषोत्तम कापुरे (वय-३२) रा. जुने जळगाव याने नशिराबाद पोलीसांना दिली. या संशयावरून सोमवारी ३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता नशिराबाद येथील शेख मुस्ताक शेख मुसा कुरेशी, जमील अहमद शेख मुसा कुरेशी, आरिफ खान तसलीम खान, आरीफ खान याची आई आणि एक अनोळखी व्यक्ती यांनी सागर  कापुरे याला बेदम मारहाण केली. त्यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या सहाय्यक फौजदार हसमत अली बशीर अली सैय्यद आणि पोलीस नाईक सुधीर रघुनाथ विसपुते यांनी देखील धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी सकाळी १० वाजता शेख मुस्ताक शेख मुसा कुरेशी, जमील अहमद शेख मुसा कुरेशी, आरिफ खान तसलीम खान, आरीफ खान याची आई आणि एक अनोळखी व्यक्ती सर्व रा. नशिराबाद ता.जि.जळगाव यांच्या विरोधात नशिराबाद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे करीत आहे.

Exit mobile version